Saturday, 20 January 2018
Friday, 19 January 2018
पराभव - सुरेश भट
सुरेश भट आणि त्याच्या गझल हा मराठी साहित्याचा महत्वाचा भाग आहे. त्यांच्या गझलांमधील आशावाद आणि खंबीरपणा यांना तोडच नाही. कितीही दुर्दम्य परिस्थिती उद्भवली, संकटांचे डोंगर समोर उभे राहिले, तरी परिस्थितीला शरण न जाता त्या परिस्थितीला नमवायची धमक तरी त्यांच्या गझल मधून दिसून येते; नाहीतर वाईटातून चांगले शोधून काढून त्याचे उदात्तीकरण करण्याची खासीयत तरी आढळून येते. त्यांची अशीच एक भावलेली गझल...
पराभव - सुरेश भट
झालो तसा कुठे मी बदनाम बोलवांनी?
झाला समुद्र केव्हा घायाळ तारवांनी?
येथील माणसांशी माझे जीवंत नाते,
वाळीत टाकलेले आहे मला शवांनी!
त्या मैफलीत माझी होती कुठे हजेरी?
ते धन्य धन्य झाले त्यांच्याच वाहवांनी!
आता कुणी कधीही घेऊ नये भरारी...
ओलांडले नभाला केव्हाच कासवांनी!
आरोपही कराया मिळतो कुठे पुरावा?
सारे गुन्हेच आता सजतात उत्सवांनी!
तेव्हा तुझ्यापुढे मी वठलो तरूप्रमाणे...
आता फुलारतो मी नुसत्याच आठवांनी!
आता उजाडताना माझा निरोप घे तू...
सांगू नये फुलांना भलतेच या दवांनी!
आली न याद माझी कुठल्याच श्रावणाला,
विझवून टाकले मी आयुष्य आसवांनी!
एकेक युद्ध माझे मी हारलो, तरीही
मजला अजिंक्य केले माझ्या पराभवांनी..!!
Saturday, 13 January 2018
नाती जपा आनंदी रहा
जर आपण मनात राग न ठेवता रोजच आपली नाती जपून ठेवली तर संक्रांतीच्या दिवशी "गोड बोला" असे बोलण्याची गरजच भासणार नाही.
नाती जपा आनंदी रहा.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१४ जानेवारी २०१८
Tuesday, 2 January 2018
माणसांचे चेहरे
माणसांचे चेहरे वाचायला
आजकाल चुकतो आहे
चुकीचे वाचल्यामुळे मी
बरंच काही भोगतो आहे
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१ जानेवारी २०१८
Saturday, 30 December 2017
सकारात्मक चर्चा हीच खरी ताकद
आपण रोज ज्या व्यक्तीच्या सहवासात राहत असतो त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल पहील्या भेटीतच एक आदर (सकारात्मक किंवा नकारात्मक) तयार झालेला असतो.
जर एखादी चूकून चूक झाली असेल तर आयुष्याभर तीच चूक समोरच्या व्यक्तीच्या मनात घर करून राहते. आपल्या हजार चांगल्या कामासमोर ती एक छोटी चूक समोरच्या व्यक्तीच्या मनातून आपले स्थान नष्ट करून टाकते. आपण खरे सांगण्याचा कितीही प्रयत्न केला तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. ती समोरची व्यक्ती आपल्याला टाळू लागते. या साऱ्या गोष्टीमुळे आपले श्रेय दुसराच कोणीतरी घेऊन जातो.
समोरच्या व्यक्तीचे एक कर्तव्य आहे की ज्याच्याकडून चूक झाली आहे त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याला विश्वासात घेऊन सकारात्मक चर्चा करून नात्यातली दरी जी वाढत आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करावा असे मला वाटते. सकारात्मक चर्चेतून नात्यात पुन्हा गोडी येते. दोघांच्याही मनात कोणत्याही शंकेला जागा राहत नाही. ते दोघे एकत्र राहू / व्यवहार करू शकतील. यामुळे दोघांचाही फायदा आहे. विचारांची देवाणघेवाण होईल.
सकारात्मक चर्चा हीच खरी ताकद आहे.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
३१ डिसेंबर २०१७
Sunday, 17 December 2017
काय आहे जीवनात
काय आहे जीवनात या
कधी नकोसं वाटत आहे,
इच्छा नसता जगण्याची
तरी माणूस जगत आहे !
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ डिसेंबर २०१७
पैसा फक्त पैसा
जन्मापासून मृत्यूपर्यंत
पैसाच मोठा ठरत आहे
प्रत्येक जण यालाच का?
देव मानून जगत आहे!
काळजी घ्यावी लागते
नाजूक नाती जपताना
जग नेहमी पाहत आहे
पैश्यामुळे नाती तुटताना
न्याय मिळत नाही लवकर
तो, चार भिंतीत जगत आहे
पैसात ताकद आहे मोठी
का, येथे कायदा मरत आहे?
पैसा चांगला की वाईट?
याचं उत्तर सापडत नाही
पण पैश्याशिवाय जगात
कुठे काहीच घडत नाही!
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ डिसेंबर २०१७
