Thursday, 1 December 2016

माया जाल

अनेक नात्याच्या चक्रात अडकलो
सांभाळून घेणारे आपलेच  सारे
माया जाळात गुंतता हृदय हे
प्रेम विश्वासावर जग तरले सारे

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ मे २०१५

इच्छा दहन

प्रत्येक वेळी एक मजबूरी असते
म्हणून माणूस अन्याय सहन करतो,
त्यामुळे स्वतःच बरयाचदा तो
नकळत आपल्या इच्छा दहन करतो !

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०६ मे २०१५

शब्दांचे युद्ध

झोपच हरवून गेली,
माझी कवितेच्या ध्यासात.
शब्दांचेही युद्ध पेटते,
नेहमी माझ्या मनात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ मे २०१५

विश्वास

विश्वास कसा ठेवायचा,
आपल्या जवळच्या माणसांवर?
सावलीही सोडते साथ
इथे काळोख असल्यावर !

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०२ मे २०१५

स्वभाव

अनेक स्वभावाची माणसे,
रोज येथे भेटतात.
गुंततात एकमेकांत कधी
कधी मने येथे दुखावतात

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० एप्रिल २०१५

तुझ्यावर चारोळी लिहिताना

तुझ्यावर चारोळी लिहिताना,
शब्द मला अडवितात.
अरे! हे लिहून उपयोग नाही,
तुझे नयनच तिला घडवितात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ फेब्रुवारी २०००

तुझ्यात मला परमेश्वर दिसावा

जूलमी तुझ्या या नयनांवर,
पापण्यांचा भार का असावा.
नजरेचे दार बंद होताच,
तुझ्यात मला परमेश्वर दिसावा.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१७ फेब्रुवारी २०००