Friday, 30 January 2026

समाधान

माणूस जितका जास्त समाधानी असेल, तितकं सुख भरभरून मिळत असतं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
३० जानेवारी २०२६

Tuesday, 27 January 2026

खंबीर नेतृत्व

खंबीर नेतृत्व करणारे असतील, तर आपली माणसं अधिक प्रमाणात जोडली जातात आणि विरोधक बेचैन होतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
२८ जानेवारी २०२६

Friday, 23 January 2026

आयुष्य एक साचा

आयुष्य एक साचा आहे. तो साचा बालपण, तरुणपण अशा टप्प्यांनुसार बदलत असतो. या प्रवासात आपण वेगवेगळ्या नात्यांमध्ये गुंतत जातो. प्रत्येक नात्याच्या साच्यात बसण्यासाठी आपल्याला वेळोवेळी स्वतःमध्ये बदल करावा लागतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
२४ जानेवारी २०२६

Wednesday, 21 January 2026

आपली माणसं

आपल्या मनासारखे घडले नाही म्हणून आपल्याला फार वाईट वाटते. काही वेळा हे सर्व घडवून आणण्यास आपलीच माणसे जबाबदार असतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
२२ जानेवारी २०२६

Saturday, 17 January 2026

विरोधक

कर्तव्य बजावत असताना जर आपल्यामध्ये स्वार्थ आला, तर समजावे की आपले विरोधक तयार होत आहेत. कारण स्वार्थ साधून केलेले काम इतरांचे नुकसानही करू शकते!

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
१८ जानेवारी २०२६

Saturday, 10 January 2026

राग येणं स्वाभाविक आहे

आपण जेव्हा खरं बोलून मोकळे होतो, तेव्हा कधीकधी ज्याच्याबद्दल बोललो आहे त्या व्यक्तीला राग येणं स्वाभाविक आहे. समोरची व्यक्ती आपला राग थेट व्यक्त करत नसली, तरी परिणाम म्हणून हळूहळू नातेसंबंधांतील अंतर वाढत जातं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
१० जानेवारी २०२६

Monday, 5 January 2026

मी पणा

स्वतःहून आपल्या वाट्याला कोणीही येत नाही. पण जेव्हा आपला मीपणा आडवा येतो, तेव्हा आपल्याला खरं आणि खोटं यांची पारख करता येत नाही. मीपणा ज्याच्या अंगी असतो, त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली असते. मीपणामुळे समाजात कितीही इज्जत कमी झाली तरी त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही, कारण मीपणामुळे तो विचार करण्याची शक्ती गमावून बसलेला असतो. मीपणा मिरवणारा माणूस जिवंत असला तरी तो समाजाच्या नजरेत कधीही येत नाही, कारण प्रत्येकजण त्याला नजरेआड करण्याचा प्रयत्न करत असतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०५ जानेवारी २०२६