Saturday, 28 June 2025

उसाचा चोथा

चोथा होईपर्यंत उसाचा रस काढला जातो, कारण शेवटच्या थेंबामध्येही त्याचा गोडवा टिकून असतो. माणसाचंही तसंच असतं — चांगल्या माणसांची गरज संपली की, त्यांची किंमत कमी होते.


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२७ जून २०२५

Monday, 23 June 2025

प्रवास मृत्यूच्या दिशेने

"अजूनही आपण जिवंत आहोत!" याच जाणीवेतून कदाचित जन्मदिवस / वाढदिवस साजरा केला जात असावा. तसं पाहिलं तर सर्वांनाच माहीत आहे की आपला प्रवास मृत्यूच्या दिशेने सुरू असतो.
 

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२३ जून २०२५

Friday, 20 June 2025

प्रेम म्हणजे लफडं

दोघांचं एकमेकांवर कितीही खरं प्रेम असलं तरी जगाला ते "लफडं" वाटतं! चांगलं काय आणि वाईट काय आहे? हे जगापेक्षा आपल्यालाच कळतं. म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं.
 

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० जून २०२५

Saturday, 14 June 2025

स्वतःमध्ये बदल

दुसऱ्याने आपल्याला त्रास दिला म्हणून आपण त्याचा बदला घ्यायचा नसतो. अशा वेळी त्याचा स्वभाव आपल्याला कळतो, म्हणून आपण स्वतःमध्ये बदल करणे गरजेचे असते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१४ जून २०२५

Friday, 13 June 2025

मृत्यूच्या अधीन

"मृत्यूच्या मनात येईल तेव्हा तो आपल्याला घेऊन जाऊ शकतो.
म्हणून आपण आपले जीवन मृत्यूच्या अधीन करण्याआधी, दुसऱ्यांना आनंद देत पूर्णत्वाने जगून घ्यायला हवं." 

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१३ जून २०२५

Friday, 6 June 2025

श्वास आपल्याला सोडून जातो

बालपण आणि तरुणपणही निघून जातं. म्हातारपण आलं की आयुष्यभर आपल्या सोबत असलेला आपला श्वासही आपल्याला सोडून जातो. मग आपण कोणाची वाट पाहत जगत असतो?

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ जून २०२५

Saturday, 31 May 2025

वाईट विचारांचा बांध

मनात वाहणारे विचार आपली बेचैनी वाढवत असतात. त्यासाठी मनात येणाऱ्या वाईट विचारांना बांध घालावा लागतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
३१ मे २०२५