मारली दडी पावसाने
मारली दडी त्या पावसाने
शेतकरी माझा चिंतातूर झाला,
पेरण्या पडल्या पार लांबणीवर
काय खेळ पावसाने मांडला?
सातारा, सोलापूर, कोल्हापूर
असो लातूर, बीड वा विदर्भ,
टिपूस एकही नाही पावसाचा
कशी परिक्षा बघतोय निसर्ग?
घ्यायचं कसं पिक यंदा?
राज्यात सार्या कहर झाला,
पाहून गैरहजेरी पावसाची
होईल उशीर लई पेरणीला।
लाच देण्याची पावसाला
पद्धत येथे असती जर,
बदल्यात त्याकडून शेतीला
मागितली असती एक सर।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०४ जूलै २०१५
No comments:
Post a Comment