Sunday, 4 December 2016

श्रावण

श्रावण

चातुर्मासातील श्रेष्ठ महिना
असे वर्णन होते श्रावणाचे,
हिरवळ दाटून येई चोहीकडे
होई सुरू खेळ ऊन-पावसाचे।।१।।

शेतात हाकतो आनंदाने नांगर  
शेतकरी राजा खुशीत येऊन
स्वप्न होती साकार तयांची,
डोलणारी टपोरे पिकं पाहून ।।२।।

सण उत्सवाचा महीना हा
ओळख हिच आहे श्रावणाची,
सासुरवाशीण वाट पाहत आहे
आतुरतेने आपल्या भाऊरायाची ।।३।।

सण उत्सवाचा आहे नागपंचमीचा
येई शुक्ल पक्षातील पंचमीला,
येऊन एकत्र सारे भक्तजन
मनोभावे पूजितं असे वारुळाला ।।४।।

भाऊ बहीणीचं नातं जपणारा
नारळी पौर्णिमा सण भारी,
कोळी बांधव मोठ्या श्रद्धेने
समिंदराला अर्पण नारळ  करी ।।५।।

श्रावण वद्य अष्टमी रोजी
श्री कृष्ण जन्म होई,
पुढच्या दिवशी गोकुळ अष्टमी
दहीहंडीला फार धम्माल येई ।।६।।

श्रावणाला शेवटी निरोप देताना
दिवस असे पिठोरी अमावस्याचा,
वर्षभर राबती बैलजोडी शेतात
दिवस त्यांना विश्रांती देण्याचा ।।७।।

दाना भरून येई कणसात
संपताच असा हा श्रावण,
शेतकरी राजा करीत असे
उडवीत पाखरे शेताची राखण ।।८।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२५ ऑगस्ट २०१५

No comments:

Post a Comment