जादूगार पाऊस
कधी क्षणात सुखावून जातो अन्
कधी डोळ्यात अश्रूची धार आहे,
मन कधी सावरत, कधी कोसळत
पाऊस हा जादूगार आहे ।
सुखद दुखःद आठवणी सह
बरसतो पाऊस संततधार आहे,
काय ऊपमा द्यावी त्याला
पाऊस हा जादूगार आहे ।
बरस तु गरज आहे तेथे
शेतकर्याला कर्जाचा भार आहे,
धान्य पिकवणाराच ऊपाशी राहतो
पाऊस हा कसला जादूगार आहे?
यल्लप्पा सटवाजी कोकणे
२९ जून २०१५
No comments:
Post a Comment