Sunday, 4 December 2016

झाड वाचवा

झाड वाचवा

ऊन्हाचे चटके सोसत आहे
रस्त्यावरून चालत असताना,
एकही झाड दिसत नाही
दूर-दूरवर पहात असताना।।१।।

पक्षांचा ही आसरा आता
काहीसा धोक्यात आला आहे,
घरट्यासाठी पहा त्यांचा
शोध कसा वाढला आहे ।।२।।

प्राणवायू मिळतो झाडातून
हे विसरून कसं चालेल?
विचार करतो नेहमी मी
ही झाडे तोड कधी थांबेल? ।।३।।

माणसांचे असे कृत्य पाहून
काळीज तीळ तीळ तुटत आहे,
झाडांवर कोणी घाव घातल्यावर
मुळांचा ही धीर सुटत आहे ।।४।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१४ ऑगस्ट २०१५

No comments:

Post a Comment