श्वास हा थांबून राहतो ।
आठवणीत वाहून मी जातो ।।
जेव्हा चेहरा तुझा आठवतो ।।धृ।।
ओल्या पापण्यांची तुला आन ।
दाटून येतो माझा प्राण ।।
एकांतात, तुझ्या आठवणीत जगतो ।।
जेव्हा चेहरा तुझा आठवतो ।।१।।
लाजणे तुझे घायाळ करते ।
नजर तुझी इशारा करते ।।
का रात्रीत मी वेडा जागतो ?
जेव्हा चेहरा तुझा आठवतो ।।२।।
साथ नेहमी तुझी मागतो ।
प्रीतीचा वारा मनी वाहतो ।।
तुझ्याच चाहूलीचा भास असतो ।।
जेव्हा चेहरा तुझा आठवतो ।।३।।
श्वास हा थांबून राहतो ।
आठवणीत वाहून मी जातो ।।
जेव्हा चेहरा तुझा आठवतो ।।धृ।।
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०८ जून २००८
No comments:
Post a Comment