Thursday, 27 November 2025

आईच्या गर्भात

जगात आल्यावर आपला स्वार्थ पूर्ण होत असताना आपले आयुष्य कमी कमी होत जाते. परंतु आईच्या गर्भात आपण वाढत असलो तरी तिच्याकडून आपल्याबद्दल कोणतीही अपेक्षा नसते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
२७ नोव्हेंबर २०२५

Sunday, 23 November 2025

पुरुषांच्या नजरा

इतर पुरुषांच्या नजरा बदलायला वेळ लागत नाही, म्हणून बायकांनी आपला नवरा कसाही असो, तरी त्याच्याशी एकनिष्ठ राहावं.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
२४ नोव्हेंबर २०२५

Saturday, 15 November 2025

काळजीत असलेली माणसं

माणसं अशी जोडा, जी आपली काळजी करत आपल्यासाठी आपल्या आजूबाजूला राहण्याचा प्रयत्न करतील.
नाहीतर स्वतः काळजीत असलेली माणसं आपल्याला शोधत येतच असतात.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
१५ नोव्हेंबर २०२५

Thursday, 13 November 2025

खऱ्या माणसाच्या मनात

खोटं बोलणारा नेहमीच कुठल्या ना कुठल्या अडचणीत सापडत असतो, पण खरा माणूस बिनधास्त जगत असतो. कारण खऱ्या माणसाच्या मनात भीतीला जागा नसते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
१३ नोव्हेंबर २०२५

Wednesday, 12 November 2025

गुंतून राहिलं की....

कुठेही जास्त गुंतून राहायचं नसतं. गुंतून राहिलं की मर्यादा तयार होतात, आणि त्यामुळे विचारांची मोकळीक हरवते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
१२ नोव्हेंबर २०२५

गुंतून राहिलं की....

कुठेही जास्त गुंतून राहायचं नसतं. गुंतून राहिलं की मर्यादा तयार होतात, आणि त्यामुळे विचारांची मोकळीक हरवते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
१२ नोव्हेंबर २०२५

Thursday, 6 November 2025

वय वाढत जातं तेव्हा....

वय वाढत जातं, तेव्हा शरीर थकायला लागतं. परिस्थिती सारखी खुणावत असते — "तुझी जबाबदारी अजून संपलेली नाही." माणूस शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत असतो, कारण त्याला जबाबदारीची जाणीव असते. जे जीवंत असूनही मेल्यासारखे असतात, त्यांना जगाचं काहीच देणं-घेणं नसतं!


यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०७ नोव्हेंबर २०२५

Wednesday, 5 November 2025

हिसकावून घेतलेलं

हिसकावून घेतलेलं असेल तर मन फार विचलित होतं; पण प्रयत्न करून, कष्टाने कमावलेलं असेल तर खऱ्या अर्थाने जीवन जगल्यासारखं वाटतं.


यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०५ नोव्हेंबर २०२५

Tuesday, 4 November 2025

तहानभूक विसरून

तहान भूक विसरून जे काम आपल्या हातून होतं त्यात आपण यशस्वी होतो. त्यातून मिळालेला आनंद नेहमी लक्षात राहतो.


यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०५ नोव्हेंबर २०२५

Saturday, 1 November 2025

कितीही शिकलेला असला..

माणूस कितीही शिकलेला असला, तरी समोरच्याच्या डोळ्यातील भाव वाचता आला नाही, तर त्या शिक्षणाचा काहीच उपयोग होत नाही.


यल्लप्पा सटवाजी कोकणे....✍🏼
०२ नोव्हेंबर २०२५