यल्लप्पा सटवाजी कोकणे
Monday, 31 August 2020
नाजूक नाते
नाजूक नाते
रोज नवीन दिवसांत
प्रवेश आपला होतो
कशासाठी जीव वेडा
नकळत झटला जातो
राग रूसवा कशाला
कशाला लोभ माया
किती संभाळले तरी
जळून जाते काया
नको मनात शंका
नको देखावे खोटे
जपता नाजूक नाते
धन्य ते जगणे होते
यल्लप्पा सटवाजी कोकणे
३० ऑगस्ट २०२०
‹
›
Home
View web version